(गुहागर / रामदास गमरे)
पाटपन्हाळे गावचे आदर्श व्यक्तिमत्व दिवंगत बाबू भागुराम कदम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुक्काम पोस्ट पाटपन्हाळे (कदमवाडी), तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे.
दिवंगत बाबू भागुराम कदम हे बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर शाखेचे माजी चेअरमन तसेच बौद्धजन मागासवर्गीय नागरी पतसंस्था मर्यादित, गुहागरचे संचालक विश्वनाथ बाबू कदम यांचे वडील होते. ते हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वसमावेशक स्वभावासाठी परिचित होते. कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले आणि कुटुंब एकसंघ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आजही कुटुंबीय व आप्तेष्टांना जाणवत आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अशोक कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

