(गुहागर)
मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर विद्यानिकेतन, हेदवी येथील कु. भक्ती रमाकांत चव्हाण हिची चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
यापूर्वीही कु. भक्तीची दिवाळी अभ्यास वर्गासाठी निवड झाली होती. अभ्यासाबरोबरच खेळ क्षेत्रातही तिने तालुकास्तर व जिल्हास्तरावर उल्लेखनीय नैपुण्य सिद्ध केले आहे. तसेच वक्तृत्व, नृत्य आदी विविध शालेय उपक्रमांमध्ये तिचा सातत्यपूर्ण आणि उत्स्फूर्त सहभाग असतो.
हा पुरस्कार मिळवण्यासाठी तिला वर्गशिक्षक गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोगळेकर, श्री. चव्हाण सर, श्री. मोरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
कु. भक्तीच्या या यशाबद्दल सर्व पालकवर्ग व ग्रामस्थांकडूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

