(राजापूर / तुषार पाचलकर)
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाचल विभाग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेच्या वतीने आज (शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६) रोजी सकाळी १० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) सोबतच मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमास विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सक्रे, विभागप्रमुख विलास नारकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा परिषद उमेदवार सौ. समीक्षा चव्हाण, पंचायत समिती उमेदवार सौ. भामिनीताई सुतार, सौ. योगिताताई डांगे उपस्थित होत्या.
यावेळी मोहन नारकर, ज्येष्ठ शिवसैनिक व पत्रकार नारायण पांचाळ, अनंत कोलते, सुनील नारकर, जयंत धावडे, मंगेश नारकर (मनसे उपतालुकाध्यक्ष), शिरीष सुतार (मनसे शाखाध्यक्ष) यांच्यासह शिवसेनेचे ओंकार नारकर, प्रवीण शेटे, मनोज शार्दूल तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त करण्यात आला.

