(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. पद्मजा प्रेमप्रकाश कारेकर यांना सन २०२५–२६ साठी जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. या गौरवाबद्दल राजापूर नगर वाचनालयाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हा पुरस्कार जाहीर होणे ही राजापूर नगर वाचनालयासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब असून, ग्रंथालय चळवळीत सौ. कारेकर यांनी दाखवलेल्या निष्ठा, चिकाटी आणि सेवाभावाची ही योग्य दखल असल्याचे मत वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते सौ. कारेकर यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार समारंभास वाचनालयाचे माजी अध्यक्ष जयंत अभ्यंकर, जयेश हार्डीकर, श्री. ओळकर, शैलेश आंबेकर, सौ. श्रुती ताम्हणकर, राजन रानडे तसेच वाचनालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

