(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय येथे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ यां कार्यक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेच्या वतीने निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना मालगुंड परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
मागील अनेक वर्षे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत होण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेचा नेहमीच पुढाकार असतो. त्यानुसार यावर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मालगुंड शाखेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेतील विविध गटांमध्ये निबंध स्पर्धांमध्ये गट क्रमांक १ – इयत्ता पहिली ते चौथी विषय – १. माझी आई२. माझी शाळा शब्द मर्यादा – १५० ते २००,गट क्रमांक २ – इयत्ता पाचवी ते आठवी विषय१. माझी माय मराठी २. माझा आवडता साहित्यिक गट क्रमांक ३ – इयत्ता आठवी ते बारावी विषय १. अभिजात मराठी भाषेचे महत्त्व२. मालगुंड कवितेची राजधानी, गट क्रमांक ४ – खुला
विषय १. मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण २. पुस्तकांचे गाव : महत्व व गरज तसेच
क्तृत्व स्पर्धेसाठी गट क्रमांक १ – शालेय विषय १. माझी शाळा आणि मराठी २. सक्तीची मराठी भाषा व शाळांमधील वास्तव३. वाचाल तर वाचाल वेळ – ४ ते ५ मिनिट गट क्रमांक २ – खुला
विषय १. अभिजात मराठी भाषा : गरज आणि महत्व २. पुस्तक माझे मार्गदर्शक ३. आधुनिक मराठीचे जनक : कवी केशवसुत वेळ – ५ ते ६ मिनिटे
अशा स्वरूपात स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, शुभदा मुळ्ये,रामानंद लिमये, शिरीष लिंगायत, उज्वला बापट यांचेसह कवी केशवसुत स्मारक सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

