(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे वार्षिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सन 2025 – 26 चा राज्यस्तरीय विशेष पुरस्काराचे मानकरी श्री. गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ हे ठरले आहेत व उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता हा पुरस्कार श्री. कमलेशा जनार्दन मुसलोणकर संचालक, दुर्वांकुर ग्रंथालय दापोली, तर उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार सौ. पद्मजा प्रेमप्रकाश कारेकर, ग्रंथपाल नगर वाचनालय राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्त्यांना व ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चांगले कार्य करणारे ग्रंथालय श्री शिंगेश्वर वाचनालय शिरशिंगे वर्ग – ड ता. दापोली, जि. रत्नागिरी, यांना घोषित करण्यात आला आहे.
यावर्षीचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्तिकरित्या वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 07 फेब्रुवारी व रविवार दि. 08 फेब्रुवारी 2026 रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. त्यावेळी उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात येतील. सर्व विजेत्यांचे रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण साबणे व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

