( चिपळूण )
मुंबई महानगर पालिकेसह महाराष्ट्रातील विविध महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल चिपळूण शहरात शिवसेना व भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ “महायुतीचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
या आनंदोत्सवप्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, भाजपचे नगर पालिकेतील गटनेते शशिकांत मोदी, शिवसेनेचे गटनेते अंकुश आवले, माजी नगरसेवक करामत मिठागरी, महंमद फकीर, विजय चितळे, महेश दीक्षित, भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांच्यासह शिवसेना–भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगर पालिका निवडणुकांतील या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, आगामी काळात विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

