(देवरूख / प्रतिनिधी)
श्री मार्लेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुरादपूर येथील समस्त शिंदे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भाविक यात्रेकरूंना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम हेमंत आत्माराम शिंदे व धनंजय आत्माराम शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला.
कै. मातोश्री शोभना (सुमन) आत्माराम शिंदे, कै. पिताश्री आत्माराम धाकोजीराव शिंदे, कै. परशुराम धाकोजीराव शिंदे काका, कै. शरद आत्माराम शिंदे, कै. श्वेता शरद शिंदे, कै. संध्या मोहन बागवे आणि कै. अविनाश आत्माराम शिंदे यांच्या स्मरणार्थ हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
महाप्रसाद वाटपप्रसंगी तहसीलदार अमृता साबळे, हेमंत शिंदे, आत्माराम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष पंकज पुसाळकर, मुरादपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच दिक्षा बांडागळे, शिंदे कुटुंबीय तसेच मुरादपूर पाठीची वाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे यात्रेकरूंनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.

