( रत्नागिरी )
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरी तालुक्यातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या नव्या सहकाऱ्यांचे मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षात स्वागत केले.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे व कुवारबाव जिल्हा परिषद गटातील सौरभ नाचणकर, विशाल नाणीजकर, आर्यन चव्हाण, अथर्व शिंदे, प्रथमेश लोहार, रुचिग मुडे, विराज बिजम आदी तरुणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश संघटनेला बळ देणारा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, माजी जिल्हा सचिव बिपीन शिंदे, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, सागर पावसकर, महिला सेना तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, जनहित कक्ष उपचिटणीस ॲड. माधवी पालकर, अक्षय मोरे, पप्पू पेडणेकर, नितीन रायकर, सर्वेश जाधव, मार्विक नारकर, तेजस नागवेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी तालुक्यात मनसेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

