(दापोली)
ए. जी. हायस्कूल दापोली येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी रिद्धीमा सुदेशकुमार चव्हाण हिला चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात चतुरंग प्रतिष्ठानचा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध वर्तन, सहशालेय उपक्रमांतील सहभाग तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यासाठी रिद्धीमा चव्हाण हिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या उल्लेखनीय यशाबद्दल कुमारी रिद्धीमा चव्हाण हिचे पालक, संस्था संचालक, मुख्याध्यापक तसेच ए. जी. हायस्कूल दापोलीतील सर्व शिक्षकवर्ग यांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही कामगिरी शाळेसह दापोली तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

