(चिपळूण)
ग्रुप ग्रामपंचायत शिरवली, निळवणे व आपेडे येथे दिनांक 9 जानेवारी 2026, शुक्रवार रोजी स्नेह वनभोजन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम माजी सरपंच श्री. पर्शुराम यशवंत कुळे यांच्या नेतृत्वाखाली, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या स्नेह वनभोजन कार्यक्रमाला ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, पोषण आहार सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, बाळ गोपाळ, आरोग्य विभागातील सीएचओ व आशा स्वयंसेविका, देवी पद्मावती हायस्कूल शिरवलीचे मुख्याध्यापक व शिक्षक, बचत गटांच्या महिला, पोलीस पाटील अधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच शिरवली, निळवणे व आपेडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख श्री. उंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष व कर्टेल गावचे सरपंच श्री. दिनेश चव्हाण, कंळबणी गावचे सरपंच तथा आदर्श सरपंच पुरस्कार सन्मानित श्री. साळुखें आणि उधळे गावचे सरपंच श्री. पाष्टे यांनी उपस्थिती लावली.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा स्नेह वनभोजन कार्यक्रम आनंदी, सुसंवादी आणि आपुलकीच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

