(चिपळूण)
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तत्पर प्रतिसाद देत सावर्डे गावातील शेतजमिनींची पाहणी केली. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत झालेल्या या पाहणीत कृषी विभागातील अधिकारी उपस्थित राहून पिकांची सद्यस्थिती, झालेलं नुकसान आणि संभाव्य उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री. शत्रुघ्न म्हेत्रे, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती कोमल घोडके, उप कृषी अधिकारी श्री. विकास पिसाळ, तसेच श्री. अशोक जाधव यांनी सहभाग नोंदवला. शेतकरी सूर्यकांत चव्हाण, शौकतभाई माखजनकर, मैनुद्दीन खलपे आणि वाडीतील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती, मातीतील आर्द्रतेचा ताण, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण याचा तपशीलवार अभ्यास केला. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करून आवश्यक ती शासकीय मदत व उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आश्वासन दिले.

