(राजापूर / तुषार पाचलकर)
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्ती आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मिळंद–सावडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व घरपट्टीधारक व कुटुंबांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
याच उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळा मिळंद, प्राथमिक शाळा सावडाव, मिळंद हायस्कूल तसेच गावातील सर्व मंदिरांना कचराकुंड्या देण्यात आल्या. स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. सरपंच किर्ती आयरे आणि ग्रामसेवक अमृता शिवलकर यांनी या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास मिळंद गावच्या सरपंच सौ. किर्ती आयरे, ग्रामसेवक अमृता शिवलकर, उपसरपंच रवींद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य नेहा गुरव, विजया माने, माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदीप आयरे, मिळंद हायस्कूलचे मुख्याध्यापक योगेश आयरे, प्राथमिक शाळा सावडावचे मुख्याध्यापक कोंडुस्कर, प्राथमिक शाळा मिळंदचे मुख्याध्यापक चौगले, सामाजिक कार्यकर्ते अंबाजी गुरव, रमाकांत मोरे, संजूव मोरे, सावडाव गावचे चव्हाण, रघुनाथ माने तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
या उपक्रमामुळे गावात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

