(रत्नागिरी)
कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने सीनियर तसेच 21 वर्षांखालील गटातील राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2025-26 चे आयोजन अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे 17 व 18 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरी या जिल्हा संघटनेमार्फत रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशन आणि कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कराटे प्रशिक्षक व खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धा स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर परिसर, रत्नागिरी
वेळ: सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक
संपर्क क्रमांक: 9422053283, 9422372297, 9422053928, 7875395386
जिल्ह्यातील उदयोन्मुख कराटे खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

