(जैतापूर / वार्ताहर)
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. यावर्षी 4 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यात एकूण 5 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये नाटे येथे 64 रक्तकुपीका, जानशी येथे 79 रक्तकुपिका तर आडीवर येथे 52 रक्तकुपिकांचे संकलन झाले आहे.
रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी तालुक्यातील महागणपती मंदिर पाचल येथे व ग्रामपंचायत कार्यालय सागवे येथे अशाच प्रकारे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व भक्तगण व हितचिंतक यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपला बहुमोल वेळ काढून वरील ठिकाणी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे असे आवाहन पाचाल विभागातर्फे श्री दत्तप्रसाद राजाध्यक्ष श्री सुनील चव्हाण व सागवे विभागातर्फे श्री नारायण गावकर श्री नितीन कणेरी तसेच राजापूर तालुका सेवा समितीच्या वतीने तालुका सेवा अध्यक्ष श्री संतोष वाडकर यांनी केले आहे.