( रत्नागिरी )
महावितरणची सदोष वीजपुरवठा व्यवस्था आणि तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील करबुडे पंचक्रोशीत वणव्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि छोट्या बागायतदरांचे आंबा व काजू बागांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबतची प्रलंबित शासकीय नुकसानभरपाई महावितरणच्या माध्यमातून त्वरित मिळावी यासाठी आज मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसहित महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री . जितेंद्र फुलपगारे यांची भेट घेण्यात आली.
यावेळी तत्काळ नुकसानभरपाई तसेच सदोष वीजव्यवस्थेमुळे लागणाऱ्या वणवे रोखले जावेत यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात अशी आग्रही मागणी केली. या मागणीची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तत्परतेने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी चर्चा करताना मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्यासहित करबुडे तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, उपविभाग अध्यक्ष श्री अर्जुन घाणेकर, श्री सर्वेश जाधव व करबुडे परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

