( दापोली )
दापोली तालुक्यातील कोळथरे गावात कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दि. ७ जानेवारी आणि आज दि. ८ जानेवारी रोजी एकूण १३ व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतल्याने हे सर्वजण जखमी झाले असून त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सहा जणांना कुत्र्याने चावा घेतला. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: समीक्षा मानवळ (वय २९, कोळबांद्रे), संध्या नानटेकर (४०, पंचनदी), विराज गोलतकर (१९, पंचनदी), मयुरेश परांजपे (१३, कोळथरे), पद्माकर कोळथरकर (७५, कोळथरे), गुरुनाथ मयेकर (४९, पंचनदी).
त्यानंतर आज दि. ८ जानेवारी रोजी सकाळी आणखी सात व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतला. या सर्वांनाही उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजच्या जखमींची नावे अशी आहेत:
सचिता घरवे (३५, आघारी), निखिल गुरव (२८, वणौशी),
ओमकार वैद्य (३८, उजगाव), वैशाली राऊत (६०, वणौशी), पारस येलवे (१४, पंचनदी), सुनील कानसे (४५, आघारी), दिशा दिलीप वरवटकर (४०, वणौशी).
सलग दोन दिवसांत घडलेल्या या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि कुत्र्यांची दहशत पसरली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

