(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावस येथील आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे, डॉ. अतुल पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास पावस ग्रामपंचायत सरपंच सौ. चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे, माजी नगराध्यक्ष बंडयाशेठ साळवी, नगरसेवक सुदेश मयेकर, बिपीन बंदरकर, तुषार साळवी, नेताजी पाटील, गोळप सरपंच श्रीमती कीर, उपसरपंच संदीप तोडणकर, नाखरे सरपंच विजय चव्हाण, तसेच सुशांत पाटकर, संतोष तोडणकर, जितेंद्र सिर्सेकर, डॉ. प्रवीण शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, या अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे पावस पंचक्रोशीतील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच केंद्राच्या उर्वरित आवश्यक सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ आणि नागरिकांनी नव्या आरोग्यसेवा केंद्राचे मनःपूर्वक स्वागत केले. नव्या इमारतीच्या रूपाने आरोग्यसेवा उन्नतीचा नवा अध्याय पावस पंचक्रोशीत सुरू झाल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या आरोग्य मंदिरामुळे ग्रामीण भागात आरोग्यसेवांच्या बळकटीकरणाला नवचैतन्य मिळणार आहे.
– डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी

