(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामविकास मंडळ वाटद मिरवणे संचलित खंडाळा इंग्लिश मिडियम स्कूल वाटद खंडाळा या शाळेतील इ.९ वी मध्ये शिकत असलेल्या मुस्सवीर महताब आलम या खेळाडूची पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील के.ड. हायस्कूल चिंचणी बीच येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजेत्या मुस्सवीर आलम स्पर्धकाला डॉजबॉल खेळातील नावलौकिक क्रीडाशिक्षक डॉ.श्री राजेश जाधव तसेच क्रीडा शिक्षिका सौ. ऋतुजा राजेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या खेळाडूला पुढील स्पर्धेसाठी शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष श्री. बाळशेठ जोग, मुख्याध्यापक श्री.आशिष वासावे, पर्यवेक्षिका देविका मांगले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या इंग्लिश मिडियम स्कूलचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून क्रीडा स्पर्धेतही अनेक विद्यार्थी लौकिक प्राप्त करत आहेत.

