(रत्नागिरी)
जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून चार व्यक्ती नापत्ता झाल्या असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नापत्ता व्यक्तींबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काव्या शुभम गुरव वय २६ वर्षे घर नं. १२५७, गावखडी, गुरववाडी, ता. जि. रत्नागिरी येथून ३१ जानेवारी २०२६ पासून राहत्या घरातून नापता आहेत. सदर व्यक्तीचे शिक्षण सातवी, वर्ण- गोरा, चेहरा- गोल, नाक- सरळ, डोळे- काळे, उंची- सु. ५ फुट ५ इंच, बांधा- सडपातळ, केस- काळे लांब, अंगात पिवळया रंगाचा टॉप व नेसणीस सफेद रंगाची लेगीज, मानेवर मागील बाजुस शुभम मराठीमध्ये गोंदलेले आहे, डाव्या हातावर मनगटाजवळ शुभम असे इंग्रजीमध्ये गोंदलेले आहे, भाषा- मराठी, गुजराती व हिंदी, गळयात मंगळसुत्र, हातात हिरव्या बांगडया, पायात पैजण व गुलाबी रंगाच्या चप्पल, मोबाईल नाही सदर व्यक्ती आढळून आल्यास पूर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
रुपाली राजेंद्र मयेकर, वय ४५ वर्षे, वांद्री बाजारपेठ, भंडारवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथून १ जानेवारी २०१९ पासून राहत्या घरातून नापता झाल्या आहेत. वर्णन बांधा- मजबुत, चेहरा- गोल, रंग- सावळा केस लांब काळे, नेसणीस चॉकलेटी रंगाची सहावारी साडी, चॉकलेटी रंगाचे ब्लाउज, अंगात निळया फिकट रंगाचे गरम स्वेटर, हातात हिरव्या रंगाच्या बांगडया, पायात चप्पल,मराठी/हिंदी भाषा स्पष्ट बोलतात. सदर व्यक्ती आढळून आल्यास संगमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
आसिफ फकिर महम्मद होडेकर, वय ५४ वर्षे, घर नं. ३७६०, पिंगी मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी येथून १६ सप्टेंबर २०१९ पासून नापता झाले आहेत. सदर व्यक्तीचे वर्णन उंची ५ फुट ७ इंच, रंग-सावळा, शिक्षण- नववी, सवय- चहा पिणे, बांधा- मध्यम, डोळे-काळे, केस-बारीक, नेसणीस- काळा टिशर्ट व काळी फुल पॅन्ट, गळ्यात सोन्याची चैन वगैरे काही नाही, पायात साधी स्लीपर. सदर व्यक्ती मनोरुग्ण आहे.
बारीका शुकरु दास, वय-४६ वर्षे, रा. बैगनबाडी बल्लीपीडा भ्रहमपुर, जि. गंजम, राज्य- ओडीसा सध्या रा. मिरकरवाडा जेटी, ता.जि.रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.०० वाजता ते २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास मिऱ्या बंदर समोर समुद्राच्या पाण्यात. सदर व्यक्तीची उंची-५.२ इंच, रंग- सावळा, चेहरा- उभट, नाक-सरळ, केस-काळे बारीक, दाढी मिशी काढलेली- नेसणीस काळ्या रंगाचे हाफ टि शर्ट, काळ्या रंगाची हाफ पँट आहे.
कुणाल चंद्रकांत नेवरेकर, वय-३२ वर्षे, घर नं. २१८, भाटीमिऱ्या दत्तमंदीर, रत्नागिरी, येथून 16 ऑगस्ट 2018 पासून नापता आहेत. सदर व्यक्तीचे वर्णन वय- ३२ वर्षे, उंची-साधारण ५ फुट ६ इंच, अंगाने-सडपातळ, डोळे-काळे, रंग- गोरा, चेहरा-उभट, नाक-सरळ, केस-वाढलेले विंचरलेले, नेसणीस-चौकटी शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट, शिक्षण- १५ वी, पायात फाटकी चप्पल, बोलण्याची पद्धत-मराठी, हातात छत्री व कापडी सफेद पिशवी असून सदर व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

