( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सेवाव्रती शिंदे गुरुजींनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा, समाजामध्ये त्यांच्या कार्याविषयी जाणीव होऊन त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या सेवाव्रती कार्याची वृध्दी व्हावी या उद्देशाने गुरुजीच्या नावे “सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार” सन २०१०-२०११ पासून सुरु करण्यात आला आहे.यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून याचे वितरण ११ जानेवारी रोजी नवभारत छात्रालय सभागृह दापोली येथे संपन्न होणार आहे.
निवड समितीच्या शिफारशीनुसार सन २०२५/२६ साठी ‘उत्कृट प्राथमिक शिक्षक (ग्रामीण)’ हा पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कर्दे, ता. दापोली, येथील प्राथमिक शिक्षक स्वप्नील बाळासाहेब परकाळे, तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा, आंबवली, ता. खेड, येथील प्राथमिक शिक्षिका सौ. रसिका रमेश रेवाळे यांना देण्यात आला आहे. ‘उत्कूट माध्यमिक शिक्षक (ग्रामीण)’ हा पुरस्कार एन. के. वराडकर हायस्कुल, मुरूड, ता. दापोली येथील शिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना प्रदान करण्यात आला आहे. तर मिस्त्री हायस्कुल रत्नागिरीचे इम्तियाज इमामुद्दिन सिद्दीकी यांना उत्कृट माध्यमिक शिक्षक (शहरी)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, सन २०२५/२६ साठी ‘उत्कृट प्रगतीशील शेतकरी’ म्हणून दोन शेतकच्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावचे विलास शांताराम शेलार आणि आगवे, ता. लांजा येथील महिला शेतकरी श्रीमती मिताली मिलींद जोशी यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्हयामध्ये शिक्षण, शेती, सामाजिक व कृषि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक’ (ग्रामीण व शहरी विभाग), ‘उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक’ (शहरी व ग्रामीण विभाग), ‘उत्कृष्ट कृषि विस्तार कार्यकर्ता’, ‘उत्कृष्ट कृषि उद्योजक’ व ‘उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी’ असे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम रु. ५,०००/- असे आहे. सन २०२५/२६मध्ये या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी संस्थेने विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी देऊन तसेच पत्रव्यवहार करून या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्याचप्रमाणे पात्र उमेदवारांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालय, यांच्याकडे संपर्क साधून शेतकरी, शिक्षक, कृषी विस्तार कार्यकर्ता, व कृषी उद्योजक यांची माहिती घेण्यात आली.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पुरस्कारासाठी सुयोग्य उमेदवार निवड करण्यासाठी स्वतंत्र निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये डॉ. प्रमोद सावंत, यानी अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तर प्रा. प्रभाकर शिंदे, डॉ. राजन खांडेकर, प्रभाकर तेरेकर, सुनिल गुरव, रमाकांत शिगवण, डॉ. अशोककुमार निर्वाण यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. हरिश्चंद्र कोकमकर यांनी या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या समितीने पात्र उमेदवारांबरोबर कार्यक्षेत्र स्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन संवादही साधला होता. पुरस्कार निवड समितीचे समन्वयक हरिश्चंद्र कोकमकर यांनी प्रत्यक्ष भेटीच्या दौन्याचे नियोजन चांगल्या प्रकारे केले होते. तसेच निवड समितीच्या प्रत्येक सदस्यांना नियोजित भेटीच्या दौन्याचे वेळापत्रक पाठवून पाहणी दौरा यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा कै. द. सि. सामंत गुरुजी आणि कै. पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी या गुरुद्वयांच्या स्मृति मेळाव्याप्रसंगी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अनंतराव गीते, माजी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली व विशेष अतिथी मा. ह. भ. प. ज्ञानेश्वर संजय बंडगर, संतसाहित्य अभ्यासक, व्याख्याते, वारकरी कीर्तनकार आणि प्रवचनकार, मु. घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे उपस्थितीत नवभारत छात्रालय, दापोली येथे रविवार, दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे, सर्व पुरस्कार विजेत्यांचे संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

