(देवरुख / प्रतिनिधी)
साडवली येथील इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने ‘त्विशा २.०’ (TVISHA 2.0 – Konkan Region) या भव्य आंतरमहाविद्यालयीन क्रीडा व कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न माने, मीनाताई ठाकरे स्कूलचे मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, ज्ञानदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित नागरे, सह्याद्री पॉलिटेक्निकचे विराज नरवणे, विवेक कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ८ महाविद्यालयातील १८३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. क्रिकेट स्पर्धेमध्ये संघानी अटीतटीची लढत दिली. संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या पंचांनी या सामन्यांचे पंच म्हणून काम पहिले. तसेच रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेचे दर्शन घडवले, ज्याचे परीक्षण सुप्रसिद्ध रांगोळीकार आणि मुंबई विद्यापीठ गोल्ड मेडिलिस्ट विलास रहाटे यांनी केले.
स्पर्धेचे निकाल:
क्रिकेट (मुले): श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली (विजेता), यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी (उपविजेता).
क्रिकेट (मुली): गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे (विजेता), विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कणकवली (उपविजेता).
रांगोळी स्पर्धा: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली (प्रथम क्रमांक), यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी (द्वितीय क्रमांक).
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अजिंक्य मोरे आणि त्यांच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांनी प्राचार्य डॉ. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ. नेहा माने यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच APTI, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबईचे प्राचार्य डॉ. राकेश सोमाणी, डॉ. संदीप झिने (एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल मेंबर, APTI MS आणि SVKM’s, भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई चे सहयोगी प्राध्यापक तसेच सर्व सहभागी महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक समन्वयक यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

