(राजापूर)
एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने नववर्षाच्या सुरुवातीलाच जामदाखोरे येथे प्रथमच भव्य कलगी-तुरा अर्थात पारंपरिक जाकडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेला कडाक्याच्या थंडीतही रसिक प्रेक्षकांनी मोठी उपस्थिती लावून कोकणच्या लोककलेवरील आपले प्रेम अधोरेखित केले.
या स्पर्धेमध्ये राजापूर, लांजा व रत्नागिरी तालुक्यातील नामवंत बुवा व नाचमंडळांनी सहभाग घेतला. एकूण ७ संघांनी आपली कला सादर करत पारंपरिक जाकडी नृत्याचा रंगतदार आनंद उपस्थित रसिकांना दिला.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे :
- प्रथम क्रमांक : नवलादेवी नृत्यकला पथक, गोवळ (खालचीवाडी), राजापूर
- द्वितीय क्रमांक : ओम सिद्ध सेवा नाचमंडळ, हातीवले (धावडेवाडी), राजापूर
- तृतीय क्रमांक : कारंडादेवी नाचमंडळ, खावडी (कोतवडेकरवाडी), लांजा
- उत्कृष्ट ढोकळी वादक : सुरज खाके
उत्कृष्ट शाहीर : संजय जोशी - शिस्तबद्ध संघ : नवतरुण विकास नाचमंडळ, दोनीवडे, राजापूर
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांनी आपल्या १० वर्षांच्या यशस्वी सामाजिक वाटचालीचा टप्पा पूर्ण केला. गेल्या दहा वर्षांत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवताना नागरिकांचे सहकार्य लाभले असून, हे सहकार्य भविष्यातही असेच राहील, अशी अपेक्षा मंडळाने व्यक्त केली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे एन्जॉय मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

