(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे केळये येथे आयोजित विशेष निवासी सात दिवशीय शिबिराचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिबिरातील अनुभवांवर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्राचार्य आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, या शिबिरातून स्वयंसेवकांनी विविध कौशल्ये आत्मसात केली असून सामाजिक जीवनासाठी आवश्यक असलेली जाणीव त्यातून निर्माण झाली आहे. विविध जनजागृती उपक्रमांमुळे स्वयंसेवक स्वतः प्रेरित झाले ती प्रेरणा विविध ठिकाणी उपयोगी पडेल. एन.एस.एस. शिबिरामुळे समस्यांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते, समस्या समजून घेणे, त्यांचे आकलन करणे व त्या कशा प्रकारे सोडवाव्यात हे शिबिरातून शिकायला मिळते, असे त्यांनी सांगितले. या शिबिरामुळे सर्व स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढला असून मनोबलही दृढ झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कनिष्ठ महाविद्यालयातील उप प्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांची पिढी उत्तम प्रकारे काम करते आणि पुढील स्वयंसेवकांना प्रेरणा देते असे सांगितले. केळ्ये गावाच्या सरपंच सौ. सौरवी पाचकुडवे यांनी स्वयंसेवकांनी नदीवरील बंधाऱ्या सोबतच , नदीतील पालास्तिक , कचरा संकलित करून नदी स्वच्छ केल्याबद्दल विशेष आभार मानले. स्थानिकांना याचा खूप फायदा होईल सोबत रस्ते स्वच्छता , प्लास्टिक संकलन , शिबिरातील प्रबोधन पथनाट्य यांचेही कौतुक केले. १५ ऑगस्ट ते २५ डिसेंबर या कालावधीत केल्या गेलेल्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. उमा जोशी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, सरपंच, तसेच मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व स्वयंसेवक यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात गावाच्या सरपंच सौ. सौरवी पाचगुडे, कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन सनगरे, प्रा उमा जोशी, प्रा हर्षदा पटवर्धन, नाखरेकर, माजी विद्यार्थी केळकर, सुरेंद्र केळकर, चिन्मय पोळेकर आणि शिबिरार्थी उपस्थित होते. या निरोप समारंभाने शिबिराच्या आठवणींना उजाळा देत स्वयंसेवकांना पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा दिली.
NSS विशेष निवासी शिबीर, केळ्ये
२५-३१ डिसेंबर २०२५
१. सर्वोत्कृष्ट लक्ष्यगीत: शारदा संघ
2. सर्वोत्कृष्ट समूहगीत: सरस्वती संघ
3. सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम: सरस्वती संघ
4. सर्वोत्कृष्ट पथनाट्य: सरस्वती संघ
5. सर्वोत्कृष्ट संघ: सरस्वती संघ
6. सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक: आसीया अत्तरवाले, सिंधू संघ
7. सर्वोत्कृष्ट नेतृत्व: शर्विल रांबाडे, ब्रह्मपुत्रा संघ
8. सर्वोत्कृष्ट श्रमदान (स्वयंसेवक): मानस कांबळे, सरस्वती संघ
9. सर्वोत्कृष्ट श्रमदान (स्वयंसेविका): अर्पिता इंजळे, सिंधू संघ
10. सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक: सार्थक डांगे, शारदा संघ
11. सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका: आर्या पळसुलेदेसाई, ब्रह्मपुत्रा संघ

