(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात तसेच सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले संदीप बारस्कर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पाचल विभाग प्रमुख नेमणूक केली आहे. सदर नेमणूक करक गावचे सरपंच सुरेश ऐनारकर, कारवली सरपंच प्रकाश दसवंत, उपविभाग प्रमुख अफझल पाटणकर, हरळ गावचे माजी सरपंच मंगेश पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
या आधी संदीप बारस्कर यांच्याकडे पाचल विभाग शिवसेना युवासेना अधिकारी हे पद होते. या पदावर कार्यरत असताना संदीप बारस्कर यांनी पक्षाच्या हिताचे निर्णय घेऊन पाचल विभागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन जिल्हाप्रमुखांनी संदीप बारस्कर यांची पाचल विभाग प्रमुख पदी नेमणूक केल्याचे सांगण्यात आले आहे. या आधी या पदावर गणेश तावडे कार्यरत होते.
संदीप बारस्कर यांच्या विभाग प्रमुख निवडीबद्दल आमदार राजन साळवी, माजी उपजिल्हाप्रमुख अशोक सक्रे, तालुका संघटक विलास नारकर सहित पाचल विभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येतं असून या अनुषंगाने आता पाचल विभागातील विविध गावांचा दौरा आयोजित करण्यात आल्याचे आमदार राजन साळवी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.