(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील भाट्ये येथील श्री क्षेत्र झरी विनायक मंदिराचा जीणर्णोध्दार, श्री देव गणपती आणि श्री देव हनुमान यांच्या पुतः प्रतिष्ठापनेसह अष्टोत्तर सहस्त्र कुंभाभिषेक हा धार्मिक सोहळा पुजकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर हिम मिनिस्टर खेळात निशिधा भाटकर प्रथम क्रमांक मिळवत पैठणीचा मान मिळवला. तर परिधी पराग रहाटे यांनी सोन्याची नथ मिळवत द्वित्तीय क्रमांक पटकावला आहे.
श्री क्षेत्र झरी विनायक मंदिराचा जीणर्णोध्दार सोहळ्यानिमित्त गुरुवारी दिनांक १० एप्रिल रोजी संध्याकाळी सहा ते अकरा पर्यंत पैठणी आणि सोन्याच्या नथसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १४० महिलांनी सहभाग घेतला होता. बाद फेरी स्वरूपात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अखेर परिधी पराग रहाटे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत सोन्याच्या नथिवर नाव कोरले आहे. परिधी रहाटे यांना अमेय ज्वेलर्सकडून सोन्याची नथ देऊन गौरविण्यात आले. तसेच निशिधा भाटकर यांनी पैठणीवर मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
नथ पटकावलेल्या परीधी रहाटे यांनी अतिशय उत्तम खेळी करून प्रेक्षकांची ही मने जिंकली. या स्पर्धेत एकूण १४० महिलांनी सहभाग नोंदवला होता. आयोजकांनी पाच टप्प्यात ही स्पर्धा घेण्याचे ठरविले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत परिधी रहाटे यांनी अतिशय चांगली खेळी करून सोन्याची नथ मिळवली आहे. अशा विविध स्पर्धेत परिधी रहाटे यांनी सहभागी होऊन अनेक बक्षिसे देखील मिळवली आहेत.