(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी थिबा पॅलेस येथील थिबा राजवाडा येथे थिबा राजा जयंती दिनी रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी थिबा राजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष मारुती कांबळे, भगवान जाधव, सचिव विजय मोहिते, सहसचिव सुहास कांबळे, शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष प्रितम आयरे, सल्लागार मंगेश सावंत, संचालक सुनील कांबळे, दिपक जाधव, बौद्धाचार्य रविकांत पवार, जयवंत कदम, विलास कांबळे, किशोर पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत सुहास कांबळे यांनी केले. अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी पुरातत्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

