(गावखडी / वार्ताहर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यानी मंथन स्पर्धा परीक्षा सन २०२५ मध्ये खूप चांगले यश संपादन करुन शाळेचे नाव उज्वल केले आहे. सदरच्या मंथन परीक्षेमध्ये कुमार विहान निलेश म्हादये इयत्ता २ री याने केंद्रात प्रथम क्रमांक, कुमार कैवल्य ओंकार अभ्यंकर इयत्ता २ री केंद्रात द्वितीय, कुमार गंधार सत्यवान पेटकर इयत्ता २ री केंद्रात तृतीय, कुमारी भूमिका प्रवीण नागवेकर इयत्ता ३ री केंद्रात द्वितीय, कुमार निनाद मनोज खरडे इयत्ता ३ री केंद्रात सहावा, कुमार यश विनायक पावसकर इयत्ता ४ थी केंद्रात तृतीय, कुमारी गार्गी निलेश म्हादये इयत्ता ४ थी केंद्रात द्वितीय, कुमारी आर्या योगेश पावसकार इयत्ता ४ थी केंद्रात आठवी त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष मुढे व सहशिक्षक श्री. मसरज शेख व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिप्ती शैलेश पावसकर, उपाध्यक्षा सौ. प्रियांका योगेश पावसकर, शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षा सौ. निरजा निलेश म्हादये, उपाध्यक्षा सौ.शमिका सचिन कुरतडकर व क्रियाशील कार्यकर्ते ओंकार शेठ अभ्यंकर तसेच शाळेचे संस्थापक श्री. दिलीप गुरव व समितीच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. सदरचे यश संपादन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष मुढे व सहशिक्षक श्री. मसरज शेख यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.