(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या फसव्या मदत पॅकेजच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे जिल्हाभर ‘काळी दिवाळी’ साजरी करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार हा निषेध नोंदवण्यात आला.
शासनाने बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक करून ज्या पद्धतीने अपुरी आणि अपमानास्पद मदत जाहीर केली आहे, त्याचा तीव्र निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात राज्यात सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे आणि प्रत्येकी हेक्टरमागे किमान ५० हजार रुपयांची मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेहमीच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत अन्यायाविरुद्ध लढा देत आली आहे. त्यामुळे पक्षाच्या या भूमिकेला सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद आणि कौतुक मिळत आहे.
निवेदन सादर करताना प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष बारक्या शेट बने, जिल्हा सरचिटणीस रणजीत शिर्के, युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, शहराध्यक्ष निलेश भोसले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, माजी नगरसेवक बबन आंबेकर, युवक सरचिटणीस मतीन बावानी, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्षा सौ. फरजाना मस्तान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

