(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड, गणपतीपुळे तायक्वांदो क्लब चा खेळाडू स्मित सुशील दुर्गवळी याने नुकत्याच चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये सुवर्ण पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दि. २३ ते २५ ऑक्टोबर रोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण चिपळूण येथे संपन्न होणार आहे. सदर स्पर्धा या राज्य संघटना अध्यक्ष डॉ.अविनाश बरगजे, महासचिव मिलिंद पठारे, जिल्हा संघटना अध्यक्ष राज्यसंघटना कोशाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा यांच्या प्रमुख मार्गधनाखाली स्पर्धा संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ४०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये मालगुंड गणपतीपुळे तायक्वांदो क्लब चा खेळाडू स्मित सुशील दुर्गवळी याने चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली व सुवर्ण पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्याला प्रशिक्षक रुपेश तावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्मित दुर्गवळी याने आपल्या उत्तम कामगिरी ने यश मिळविले आहे त्याबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, रोहित मयेकर, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, राम कररा, राज देवरुखकर, किशोर गुरव, परशुराम धोत्रे, श्रीम.सविता घनवटकर, सुरज पवार, सौ.रिया सुर्वे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

