(चिपळूण)
चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. उमेश सकपाळ यांचा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शहराच्या सर्वांगीण विकासात क्रीडा क्षेत्राला भक्कम पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या सत्कारप्रसंगी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दशरथशेठ दाभोळकर, उपाध्यक्ष व युवानेते श्री. अनिरुद्ध निकम, सेक्रेटरी श्री. राजेश सुतार, ज्येष्ठ समालोचक श्री. सचिन कुलकर्णी, सदस्य पत्रकार श्री. योगेश बांडागळे, श्री. सुयोग चव्हाण, प्रशिक्षक श्री. उदय काणेकर, श्री. फैसल मेमन, श्री. संदेश गोरीवले तसेच श्री. प्रसादजी (भाऊ) देवरुखकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूण शहरातील क्रीडा विकासासाठी नगर परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. तालुक्यातील क्रिकेट तसेच युवकांच्या क्रीडा विकासासाठी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन राबवत असलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
चिपळूण शहरात क्रीडा सुविधा वाढाव्यात, युवकांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नगर परिषद आणि क्रीडा संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.

