(चिपळूण)
चिपळूण मधील हौशी नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा कै. राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहोळा दिनांक 14 जुन 2025 रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे नामवंतांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
भाऊ कार्ले 1982 पासून हौशी रंगभूमीवर व अनेक समाज कार्यात कार्यरत असून त्यांना आजपर्यंत 8 राज्यस्तरीय व 3 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नाट्य परिषदेच्या या मानाच्या पुरस्काराने सन्मानित होताना एक वेगळे समाधान व आनंद झाला व यासाठी ज्या नाट्यकर्मी व साखरपा, चिपळूण व खेड मधील ज्या सन्मित्र सहकार्यांचे सहकार्य लाभले त्यांचेबद्दल भाऊने कृतज्ञता व्यक्त केली आहे