(चिपळूण / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना कळवंडे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ॲड. गीताताई जाधव यांना निवडून आणण्यासाठी समर्थकांकडून व्यापक आणि रणरणीत रणनीती आखली जात असून, गाव–वाडी पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गाव–वाडी पातळीवर बैठकींचा सपाटा सुरू झाला असून, विकास उर्फ अण्णा जाधव यांना विविध ठिकाणी बैठकींसाठी पाचारण केले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी बलाढ्य पक्ष आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असतानाच, कळवंडे गटातील नागरिकांकडून ॲड. गीताताई जाधव यांना उमेदवारी देण्याची ठोस मागणी पुढे येत आहे. पोसरे सुतारवाडी आणि बुरटेवाडी येथे झालेल्या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लोकांचा सहभाग आणि पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. भूतकाळात जे काही घडले ते झाले; मात्र आता आम्ही आमचा निर्णय ठामपणे घेतला आहे, असा स्पष्ट आणि ठोस सूर नागरिकांच्या बैठकीतून उमटत आहे. कोणत्याही प्रकारचे आमिष, प्रलोभन किंवा दबावतंत्र वापरून आम्हाला वळवता येणार नाही, तसेच अशा प्रयत्नांना आम्ही भुलणार नाही, आम्ही ॲड गीताताई जाधव यांनाच पूर्ण पाठिंबा नवे तर प्रचार प्रसाराच्या भूमिकेत राहणार असल्याच्या भावना महिला वर्गाकडून व्यक्त केल्या जात आहे. या बैठकांमध्ये व्यक्त होत असलेला हा एकवाक्यी सूर केवळ समर्थनापुरता मर्यादित नसून, नेतृत्वाची अपेक्षा आणि भविष्यासाठीचा विश्वास दर्शवणारा आहे. “आमच्या उमेदवार ॲड गीताताई जाधव ह्या निश्चित आहे” असा ठाम संदेश नागरिकांकडून दिला जात आहे, लोकशाही प्रक्रियेतूनच सक्षम नेतृत्व पुढे यावे, हीच भावना या बैठकीतून अधोरेखित होत आहे.
गेल्या तीन–चार वर्षांत नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणे, प्रशासकीय कामकाजात मार्गदर्शन करणे आणि सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे या कार्यगुणांमुळे ॲड. गीताताई जाधव यांचा जनसंपर्क अधिक दृढ होत आहे. या गटात गावोगावी होत असलेल्या लोकांच्या बैठकीतून एकमुखी निर्णय पुढे येत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ॲड. गीताताई जाधव यांनी उमेदवार म्हणून उभे राहावे, अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे. विविध सामाजिक, विकासात्मक आणि प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन केलेल्या ॲड. गीताताई जाधव यांच्याबाबत जनतेत व्यापक सहमती दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्या नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
यावेळी पोसरे सुतारवाडी, बुरटेवाडी येथील बैठकीला प्रदीप उदेग, अविदादा आदवडे, दीपक उदेग, संदीप उदेग, शिवराम बुरटे, विलास बुरटे, सानिका संदीप उदेग, अपर्णा आदवडे, स्वाती आंबेडे, निलेश पोसनाक, सानिका सुतार, दर्शना सुतार, वनिता बुरटे, मनोहर मेस्त्री, संतोष मेस्त्री, हेमंत पूरकर, सुदेश मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एकीकडे राजकीय समीकरणे जुळवण्याची धडपड सुरू असताना, दुसरीकडे लोकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या ॲड. गीताताई जाधव यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा कळवंडे गटातील निवडणूक रंगत अधिकच वाढवणारी ठरणार आहे.

