(चिपळूण)
मार्कंडी येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध रसिक चायनीजचे मालक श्री. संजय नारायण सावर्डेकर यांचे आज (शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ८.४५ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान वयाच्या ५६ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
तरुण वयात त्यांनी रसिक चायनीज या नावाने नावीन्यपूर्ण व्यवसायाची सुरुवात केली. गेली सुमारे ३० वर्षे कठोर परिश्रम, दर्जेदार व चविष्ट पदार्थ आणि स्वच्छतेला दिलेले प्राधान्य यामुळे त्यांनी हा व्यवसाय यशस्वीपणे नावारूपास आणला. ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते आणि दर्जेदार सेवेच्या जोरावर त्यांनी चिपळूण परिसरात विशेष लौकिक मिळवला.
त्यांच्या आकस्मिक निधनाने चिपळूण आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते परांजपे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. राजेश सावर्डेकर, डेप्युटी इंजिनिअर श्री. संतोष सावर्डेकर आणि सौ. सायली सूर्यकांत चिपळूणकर यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ठीक ७.०० वाजता मार्कंडी येथील निवासस्थानापासून निघून रामतीर्थ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

