वैदिक ज्योतिषात जशी नावावरून कुंडली तयार केली जाते, तशीच अंकज्योतिषात जन्मतारखेवरून मूलांक काढून व्यक्तीचा स्वभाव, प्रवृत्ती आणि भवितव्य जाणून घेतले जाते. अंकज्योतिषानुसार मूलांक ७ हा अत्यंत खास मानला जातो. या मूलांकात जन्मलेल्या व्यक्तींचे भाग्य विशेषतः लग्नानंतर उजळते, असे मानले जाते. या व्यक्तीवर केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे ते अध्यात्मिक, अंतर्ज्ञानी आणि गूढ स्वभावाचे असतात.
अंकज्योतिषानुसार कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असतो. या मूलांकाचा अधिपती ग्रह केतु आहे. केतु हा छायाग्रह असल्यामुळे त्याचे गुण मूलांक ७ च्या व्यक्तींमध्ये ठळकपणे दिसून येतात. हे लोक रहस्यमय, अंतर्मुख, आध्यात्मिक आणि बुद्धिमान स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव अंतर्मुख, संवेदनशील, विचारांनी खोल, लवकर भावना न व्यक्त करणारा असतो, एकांतप्रिय आणि भौतिक जगापेक्षा भावनिक व मानसिक संबंधांना या व्यक्ती जास्त महत्त्व देतात.
केतु ग्रहाचे अधिदैवत भगवान गणेश असल्याने मूलांक ७ च्या जातकांवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. मात्र अंकज्योतिष सांगते की, या मूलांकातील लोकांचे आयुष्य सुरुवातीला संघर्ष, अस्थिरता किंवा एकाकीपणाने भरलेले असू शकते. जीवनात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतात.
ज्योतिषानुसार मूलांक ७ च्या व्यक्तींना आयुष्यात संघर्षाला सामोरे जावे लागते, पण लग्नानंतर त्यांच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळते. विवाहानंतर यश, प्रगती आणि स्थैर्य मिळू लागते. नशिबाची साथ लाभते आणि जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येतात. या व्यक्ती प्रेमसंबंधात निष्ठावान असतात आणि विवाहानंतर त्यांना अधिक स्थिरता मिळते. यांच्या आयुष्यात लग्नानंतर अचानक धनलाभ, प्रमोशन किंवा आयुष्यात इतर सकारात्मक बदल जाणवू शकतात.
हे लोक एकांतप्रिय तसेच आध्यात्मिक विचारसरणीचे असतात. कोणतीही गोष्ट ते खोलवर विचार करून समजून घेतात. संशोधन, लेखन, अध्यात्म किंवा बौद्धिक क्षेत्रात त्यांची विशेष रुची असते. केतुच्या प्रभावामुळे कधी कधी असंतोष आणि एकटेपणाची भावना जाणवते, मात्र लग्नानंतर त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलते आणि आत्मविश्वास वाढतो.
अंकज्योतिषानुसार मूलांक ७ च्या जातकांचे भाग्य लग्नानंतर खऱ्या अर्थाने साथ देते. मुलगा असो वा मुलगी, दोघांच्याही जीवनात विवाहानंतर समृद्धी येते. जीवनसाथी हा त्यांच्या नशिबात मोठा बदल घडवून आणणारा ठरतो. भगवान गणेशांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. मूलांक ७ चे लोक लग्नानंतर भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर अधिक समरस होतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यात अधिक यश, आनंद आणि स्थिरता मिळते, त्यामुळे त्यांचे भाग्य उजळते.

