(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन सरपंच दिप्ती वीर यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच प्रकाश पवार, ग्राम विकास अधिकारी अमोल केदारी, ज्येष्ठ सदस्य सहदेव वीर, सुर्यकांत बंडबे, उदय अगोंडे, सदस्या वेदिका निंबरे, रीना रविंद्र वीर, माजी सदस्य यशवंत निंबरे, शिक्षक राजकुमार जाधव, अंगणवाडीच्या शुभदा महाडिक,
जेष्ठ सदस्या मायावती गोविंद पवार, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु अनिल पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, सभापती प्रकाश भागुराम पवार, सल्लागार किशोर पवार, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा – नलिनी पवार, उपाध्यक्षा- संपदा पवार, सल्लागार – मयुरी पवार, कलावती पवार, माजी सभापती कल्पना पवार,शितल पवार, आदी मान्यवर व गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी तर सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले.

