(रत्नागिरी)
वृद्धाने मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयिताने लोखंडी सळी डोक्यात घालून जखमी केले. ही घटना बुधवार १२ मार्च रोजी दुपारी १ वा. सुमारास कातळवाडी-कुवारबाव येथे घडली. जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीकांत सावंत असे संशयिताचे नाव आहे.
जखमी फिर्यादी पुंडलिक ज्ञानदेव पाटील (वय ६०, रा. कातळवाडी-कुवारबाव) यांनी संशयित श्रीकांत सावंत यांच्याकडे मजुरीचे पैसे मागितले. त्याचा राग मनात धरुन संशयिताने त्यांच्या डोक्यात लोखंडी सळी घालून जखमी केले. जखमी पाटील यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.