(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पै. हसनशेठ दाऊद मुल्ला माध्यमिक विद्यालय, कुरधुंडा यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले.
बुरंबी येथे पार पडलेल्या स्पर्धांमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुमारी तन्वी गोणबरे हिने लांब उडी व तिहेरी उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच तिहेरी उडी प्रकारात भक्ती दीपक डावल हिने तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील वयोगटातील कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या मुलींच्या संघाने दमदार खेळ करत उपविजेतेपद पटकावले.
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक रईस शेख व भास्कर चिंचवलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहसिन मुल्ला, मुख्याध्यापक शकील शेख, सहाय्यक शिक्षक सतीश पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अमोल लिंगायत, सीताराम डावल व झाकीरहुसैन सुतार यांनी अभिनंदन केले.

