(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
साउथ इंडियन एज्यु. सोसा.नवी मुंबई येथे पदवीदान दीक्षांत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कळंबस्ते ता.संगमेश्वर येथील संजय मापुस्कर यांचे चिरंजीव सांजसाई यांनी एम टेक फूड पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये मोठे यश मिळाल्याने त्यांचा गोल्ड मेडल/तिन सिल्वर मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे संजय मापुस्कर हे एक रिक्षा व्यवसायीक असून त्यांना दोन अपत्य, पैकी दोन्ही मुलांना त्यांनी सावर्डे येथे सह्याद्री शिक्षण संस्था बी टेक पर्यंत शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे साउथ इंडियन शिक्षण सोसायटी येथे एम टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
संजय मापुस्कर यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असून त्याने मुलांना शिक्षणासाठी वेगवेगळ्या उच्च ठिकाणी दाखल केले. संजय मापुस्कर यांच्या कष्टाची दखल दोन्ही मुलांनी घेतली. आणि त्यांना नुकताच नवी मुंबई येथे पदवीदान प्रदान कार्यक्रमात गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात संजय मापुस्कर उभयतांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

