(खेड / सुरेश सप्रे)
खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ,या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल The Times of India चा स्टार एज्युकेशन पुरस्कार- 2025 प्रदान करण्यात आला.
सामाजिक औद्योगिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळया पुरस्कारांसह शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना स्टार एज्युकेशन संस्थेचेवतीने पुरस्कार देण्यात येतात.
दीपक लढ्ढा यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट विश्वस्त म्हणून या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते गेले 15 ते 20 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात तसेच व्यावसायिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून सतत कार्यरत राहून खेड तालुक्याचा शैक्षणिक प्रगतीचा ध्यास घेऊन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट दर्जाचे निकाल देणे, स्पर्धा परीक्षा व विविध क्रीडांमध्ये उत्तुंग यश मिळवून देणे त्याचप्रमाणे नावीन्यतेचा ध्यास व सकारात्मक दृष्टीने विचार करणे हे तत्त्व उराशी बाळगून सतत कार्यरत असतात. Times of India च्या ग्रूपने त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना स्टार एज्युकेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे
दीपक लढ्ढा यांनी आजपर्यंत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संस्थापक सदस्य, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी, चेअरमन नियामक मंडळ व महाविद्यालयीन विकास समिती ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे बोरज, अध्यक्ष शिवाजीयन्स फुटबॉल क्लब, युवा माहेश्वरी समाज, गुजर आळी मित्रमंडळ,
विशेष कार्यकारी अधिकारी या संस्थांमध्ये पदे भुषवली आहेत.
या पुरस्कराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, प्रकाश गुजराथी, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

