(मुंबई)
मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील तब्बल २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज सायंकाळी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करणार आहेत.
या घोषणेसह आजपासूनच संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असून, राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत :
1. अहिल्यानगर
2. अकोला
3. अमरावती
4. भिवंडी-निजामपूर
5. बृहन्मुंबई
6. चंद्रपूर
7. छत्रपती संभाजीनगर
8. धुळे
9. इचलकरंजी
10. जळगाव
11. जालना
12. कल्याण-डोंबिवली
13. कोल्हापूर
14. लातूर
15. मालेगाव
16. मीरा-भाईंदर
17. नागपूर
18. नांदेड-वाघाळा
19. नाशिक
20. नवी मुंबई
21. पनवेल
22. परभणी
23. पिंपरी-चिंचवड
24. पुणे
25. सांगली-मिरज-कुपवाड
26. सोलापूर
27. ठाणे
28. उल्हासनगर
29. वसई-विरार

