( संगमेश्वर / प्रतिनिधी )
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत दिलीप रावजी मोरे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी, तर प्रताप नारायण देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच संस्थेचे अन्य उपाध्यक्ष म्हणून विक्रांत यशवंत जाधव यांची निवड झाली.
याचवेळी दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवने यांच्या शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षपदी दिनेश शामराव जाधव यांची देखील निवड करण्यात आली. कार्यक्रमावेळी दादासाहेब सरफरे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

