(खेड)
रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच बिजघर नंबर १ शाळेमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तिसंगी आपटा कोंड केंद्रांतर्गत सात शाळांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव भोसले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन नेव्ही मधून निवृत्त झालेले राजेंद्र भोसले, निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, पोलीस दलातून निवृत्त झालेले नारायणराव भोसले, सरपंच शुभांगी भोसले, उपसरपंच सखाराम जाधव, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर सामाजिक कार्यकर्ते मंगेश मर्चंडे, ग्राहक पंचायत खेडचे अध्यक्ष विजय येरुणकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, शिक्षणप्रेमी विश्वास मर्चंडे, सामाजिक कार्यकर्ते कमलेश भोसले, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष काशीराम सुर्वे, विजय भोसले, वैशालीताई भोसले, राजश्री राजेंद्र भोसले, तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, विजय सकपाळ संदीप घाणेकर शैलेश पराडकर शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सर्व बिजघर ग्रामस्थ बंधू भगिनींनी मेहनत घेतली. सदर स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद बिजघर नंबर १ शाळेने मिळवले.

