(खेड)
गणेशोत्सवाच्या उत्साहात खेड तालुक्यातील भोस्ते गावात दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता गणपती विसर्जनावेळी नदीपात्रात मंगेश पाटील हा तरुण बुडाला होता.
घटनेनंतर तातडीने एनडीआरएफ, पोलीस प्रशासन व नगरपंचायत खेड यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. तब्बल २२ तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर आज शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजता मंगेश पाटीलचा मृतदेह भोस्ते परिसरातच सापडला, अशी माहिती प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
या घटनेमुळे भोस्तेसह संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, गणेशोत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.

