(देवरूख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, दळवी वृंदावन देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण के व तालुका सचिव व प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब उपाध्यक्षा ॲड.सौ.पुनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, महेश भागवत, अनुराधा माळी, स्वरा सुर्वे, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, हेरंब भिडे आदी उपस्थित होते.
या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, व लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
*येलो* – निकुंज घडशी, प्रचिती कांगणे, प्रभात रहाटे, शौनक राजवाडे, मिहिका लाड, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, उर्वी किल्लेदार, शुभ्रा माळी, अवनी भिंगार्डे, श्रावणी कोळवणकर, अनुराग यादव, गंधार रेवडेकर, हिरन्मयी भागवत, हेरंब भागवत.
*ग्रीन* – जीवित देशपांडे, कियान वी, रियांश वी, मयंक खानापूरकर, पूर्वा रहाटे, ओमराजे महाडिक, आदित्य आंबवकर.
*ग्रीन- वन* सई संसारे, तनिष्का कांगणे.
*ब्ल्यु* – स्वानंदी कांगणे, शर्विल कांगणे, आरोही तांबे, यश तांबे, अन्वय कोळवणकर, शुभ्रा सुर्वे.
*ब्ल्यू-वन* – अबीर शेट्ये, ऋतिक कांगणे, ईशान भागवत,
*रेड* – नक्षत्रा शिंदे, आदित्य चिपळूणकर, प्रथमेश कारेकर, वेद पटेल .
*रेड-वन*- अजिंक्य शिंदे.
या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड, आदींनी शुभेच्छा दिल्या.

