(देवळे / प्रकाश चाळके)
देवळे गावातील सोनार सुतारवाडी, मानेवाडी आणि कुंभारवाडी परिसरातील रस्त्यावर आमदार किरणजी सामंत यांच्या माध्यमातून विद्युत पथदीप बसविण्यात आले. या पथदीपांचा लोकार्पण सोहळा १ नोव्हेंबर रोजी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पार पडला.
आमदार सामंत यांच्या पुढाकारातून राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात अनेक विकासकामे धडाक्यात सध्या सुरू आहेत. देवळे गावात रस्ते, पूल, पथदीप अशा विविध मूलभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमादरम्यान दाभोळे जिल्हा परिषद गटासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील आमदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यासाठी आमदार किरण सामंत, माजी शिक्षण सभापती विलास चाळके, देवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विजया कोरगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याने, बापूशेठ शेट्ये, सौ. रजनी चिंगळे, जया माने, राजूशेठ कुरूप, विलास बेर्डे, यश कोळवणकर, हेमंत शिंदे, प्रकाश चाळके, प्रसाद अपंडकर, रेश्मा परशेट्ये, प्रमिला चव्हाण, काशिनाथ सकपाळ, राजेश रेवाळे, विलास सुकम, पोलिस पाटील विजित साळवी, बंड्यादादा परशेट्ये, संजय काळोखे, दिलीप शिर्के, राजेश कोळवणकर, निलेश कोळवणकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांचाळ, योगेश साळवी, उमेश माने, मयूर माने, वायरमन चेतन शिंदे, निलेश करंबेळे तसेच आमदारांचे सहकारी व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सोनार सुतारवाडी, मानेवाडी आणि कुंभारवाडी तर्फे आमदार सामंत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विलास चाळके यांचाही विशेष गौरव करण्यात आला. या कामासाठी मोलाचे सहकार्य लाभलेल्यांमध्ये सरपंच सौ. विजया कोरगावकर, महावितरण शाखा पालीचे कनिष्ठ अभियंता अन्सार मुल्ला, ठेकेदार श्री. संजय शेडगे, सुपरवायझर हनुमंत गराटे, युवा कार्यकर्ते यश कोळवणकर, संदीप मांडवकर आणि महेंद्र चव्हाण यांचा सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले.
देवळे ग्रामस्थांच्या वतीने आमदार किरण सामंत यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले व पुढील विकासकामांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुव्यवस्थित सूत्रसंचालन श्री. गजानन मोघे यांनी केले.

