(साखरपा / रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज, शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता एक खाजगी ट्रॅव्हल्स (बस क्र. MP 13 P1371) भीषण अपघातात ५० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
नेपाळवरून रत्नागिरीकडे येत असलेली ही बस आंबा घाटातील चक्री वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बसमध्ये त्या वेळी तब्बल ११० प्रवासी होते, यांपैकी ३७ प्रवासी किरकोळ जखमी तर ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये डेलीयन चौधरी वय 28, सुनील चौधरी वय ३१, खुशीराम वय ३९ ,जीवन परिवार २०, नीरजल २४, देबा बी के ६०, गिरसिंग धामी ५०,मुलयम सिंग ३३, देवमा धामी ४८,जसबीर थापा ४७,चंपा थापा ४७,इकमन नेपाली २२, वीर बहाद्दूर मगर ४4,दमर ठाकूर ३९,वीरेंद्र सिंग तोमर ४८,तोयनाथ खामे ४5 ,सहनील दीड वर्ष,गीता मगर ५०,ग्यानबार मगर ५२,बीर बहादूर मगर ६७,शेर सारथी ५०,बांडू ठारू ७० ,तेज ठाकूर ५२,भागीराम चौधरी ३६,किशोर ठारू ३५,राम बहादूर ७५,ईश्वर चौधरी ४०,नारायण गिरी ६०,काळसु चौधरी ५५ अशी जखमी झालेल्यांची नावे असून आठ जखमींची नावे समजू शकली नाहीत.
जखमींना तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस व साखरपा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


