(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुक्यात आरवली येथील श्रीकृष्ण उद्धव पाटणकर यांच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी त्यांची नजर चुकवून त्यांच्या दुकान काउंटरवर असलेली 1लाख 86 हजार रुपये असलेली बॅग चोरी करून तेथून पळ काढला होता. संगमेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या चोरी केलेल्या मुद्देमालसाह अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे श्रीकृष्ण उद्धव पाटणकर याचे किराणा मालाचे दुकान असून ते नेहमी प्रमाणे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी जायच्या तयारीत असताना विष्णू शांताराम गुरव उर्फ नारू गुरव (वय वर्ष 35 रा. खेरशेत गुरववाडी तालुका संगमेश्वर) व आशिष जाधव (वय 38 वर्ष, रा. खेरशेत जाधववाडी तालुका चिपळूण) हे दोघे दुकानावर येऊन विष्णू गुरव यांनी दुकान चालक श्रीकृष्ण पाटणकर यांच्याकडे मागि लतलेली तंबाखू पुडी त्याला देऊन ते दुकानातील वीज बंद करण्यासाठी आत गेले. हीच संधी साधून विष्णू गुरव आणि राजेश जाधव या दोघांनी दुकानातील काउंटर वर1लाख 86 हजार रुपये असलेली बॅग दुकान चालक श्रीकृष्ण पाटणकर यांनी ठेवली होती ती बॅग घेऊन पळून गेले.
श्रीकृष्ण पाटणकर यांना त्यांची पैसे असलेली बॅग या दोघांनी लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याची फिर्याद करताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरक्षक प्रशांत शिंदे पो. हे. कॉ. सचिन कामेरकर, पो.हे. कॉ. विनय मनवल,पो. हे. कॉ. सासवे,पो. कॉ. अनिल मस्कर यांनी तात्काळ तपास सुरु करून मोठ्या शिताफिने त्या आरोपीपर्यंत पोहचून त्यांना ताब्यात घेतले, तसेच चोरी केलेली रोख रक्कम असलेली पैशांची बॅगही जप्त केली. संगमेश्वर पोलिसांनी धाडशी केलेल्या तपास आणि कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

