(पाली)
लांजा–राजापूर–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आज श्री दत्त जयंती निमित्त संपत्नीक पाली येथील दत्त साई मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. पाली बसस्थानक परिसरात उभारलेले हे दत्त साई मंदिर आमदार सामंत यांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. आज उत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी होती.
या प्रसंगी देवस्थान समितीतर्फे आमदार सामंत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सागर सावंत, पप्पा चौगुले, दिलीप सावंत, विजय चव्हाण यांसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि पाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

