(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी मोहरम व आषाढी वारी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल सतर्क झाला आहे. यानिमित्ताने २ जुलै रोजी चंपक मैदानावर रत्नागिरी शहर पोलीस ठाणे व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांचा संयुक्त दंगा नियंत्रण सराव करण्यात आला. एक तास चाललेल्या या सरावात दोन्ही ठाण्यांचे एकूण चार पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या सरावात मनुष्यबळ आणि सामग्रीचा वापर करण्यात आला. यामध्ये ३० RCP स्टाफ , ३० दोन्ही ठाण्यांचा एकत्रित स्टाफ , ४ वाहने , ६४ लाठ्या , ६४ हेल्मेट, ३० शिल्ड (ढाली), १० SLR रायफल , १ मेगाफोन,१ गॅसगन , हँड ग्रेनेड : (उपलब्ध), १ पाईंट 2/2 रायफल, १ स्ट्रेचर, १ १२ बोअर रायफल. विशेषतः या सरावात एक अश्रुधुर नळकांडी प्रत्यक्ष फोडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
दंगा नियंत्रण सराव दुपारी ३.४५ वाजता सुरू होऊन ४.४५ वाजता संपवण्यात आला. मोहरम आणि आषाढी वारी दरम्यान संभाव्य जमावबंदी व आपत्कालीन परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

